कोल्‍हापूर : १८ ते २० मार्च अखेर आदमापुरात बाळुमामांचे दर्शन राहणार बंद

आदमापूर बाळुमामा
आदमापूर बाळुमामा
Published on
Updated on

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर यांचा वार्षिक भंडारा उत्सव दिनांक ३० मार्च ते ७ एप्रिल २०२४ अखेर संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने मंदिर, शिखर व मंदिर परिसराची स्वच्छता करण्यासाठी १८ मार्च ते २० मार्च पर्यंत तीन दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

यावर्षी पारंपरिक पद्धतीने यात्रा भरणार असून, त्याची तयारी व नियोजन सुरू आहे. मंदीर व परिसराची स्वच्छता करण्यासाठी मंदीरातील दर्शन सेवा बंद करावी लागणार आहे. त्यामुळे तीन दिवस दर्शन सेवा व अन्नछत्र बंद राहणार असून भाविकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मंदिराच्या प्रशासकीय समिती सदस्य रागीणी खडके व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा :    

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news