पंतप्रधान मोदी यांच्यावरील पोवाडा दिल्लीत पोहोचवा : खा. महाडिक | पुढारी

पंतप्रधान मोदी यांच्यावरील पोवाडा दिल्लीत पोहोचवा : खा. महाडिक

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणार्‍या पोवाड्याची संकल्पना उत्तम आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा पोवाडा चोवीस तासांत दिल्लीत पोहोचवा, असे आवाहन खा. धनंजय महाडिक यांनी केले.

भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पोवाड्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. शाहीर आझाद नायकवडी आणि संगीतकार ओमकार सुतार यांचा यावेळी सत्कार केला; तर खा. महाडिक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. महेश जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास रणजित जाधव, राहुल चिकोडे, विजय जाधव, अशोक देसाई, गायत्री राऊत उपस्थित होते. हेमंत आराध्ये यानी सूत्रसंचालन केले.

Back to top button