Lok Sabha Election : महाराष्ट्र क्रांती सेना लोकसभेच्या चार जागा लढविणार : पाटील | पुढारी

Lok Sabha Election : महाराष्ट्र क्रांती सेना लोकसभेच्या चार जागा लढविणार : पाटील

इचलकरंजी : सध्याच्या राजकारणातील अस्थिर परिस्थिती, लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात केलेली कामे पाहता महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाने लोकसभा निवडणूक मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक सुरेश पाटील यांनी दिली. (Lok Sabha Election)

पक्षातर्फे रायगड, जळगाव, सिंधुदुर्ग-रत्नागिरी आणि हातकणंगले लोकसभा या चार जागा लढविण्यात येणार आहेत. बुधवारी (13 मार्च) मुंबईत होणार्‍या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. राजकारणात सातत्याने होत असलेली स्थित्यंतरे आणि राजकीय अराजकता यामुळे मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. सध्या महाराष्ट्राचे चित्र अत्यंत विदारक आहे. जर महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने क्रांंती करायची असेल तर नव्या दमाच्या लोकांना संधी दिली पाहिजे, तरच महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्राचा विकास होईल. हाच विकासाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी नवीन कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीत संधी दिली जाणार आहे. (Lok Sabha Election)

या चारही लोकसभा मतदारसंघांत महाराष्ट्र क्रांती सेनेला चांगला प्रतिसाद असून, सेनेची ताकद निर्णायक ठरणारी आहे. या चारही मतदारसंघांत पाणी, नोकरी, शिक्षण आणि आरोग्य हे प्रश्न सोडवून मतदारसंघांचा कायापालट करण्यासाठी महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button