आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार ८ मार्च २०२४ | पुढारी

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार ८ मार्च २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : श्रीगणेश म्‍हणतात की, आज सकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला लक्षणीय यश मिळवून देईल. ग्रहमान अनकूल आहे. वेळेचा पुरेपूर फायदा घ्या. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. भविष्यातील महत्त्वाच्या योजनाही आखल्या जातील. मालमत्ता संबंधित काही कामांमध्ये गोंधळ झाल्‍याने तणाव येऊ शकतो. भावांसोबतचे संबंध बिघडण्याची शक्यता. मुलांना त्‍यांच्‍या समस्‍या सोडविण्‍यास मदत करा. तुमची कार्यशैली व्यवसायाला चालना देईल.

वृषभ : आज राजकीय आणि सामाजिक कार्यात तुमची आवड वाढेल. राजकीय संपर्कही तुम्हाला काही चांगल्या संधी देईल. नवीन वाहन खरेदीबाबत नियोजन होईल. उधार घेतलेले पैसे परत मिळवून आर्थिक समस्या सोडवली जाऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

मिथुन : आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होईल. कोणीतरी तुमच्या भावनिकतेचा फायदा घेऊ शकेल. एखाद्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी सर्व स्तरांचा काळजीपूर्वक विचार करा. मित्रांसोबत जास्त वेळ घालवणे टाळा. भागीदारीशी संबंधित व्यवसायात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. पती-पत्नीमध्ये योग्य सामंजस्य राखले जाईल. आरोग्य चांगले राहू शकते, असे श्रीगणेश म्‍हणतात.

कर्क : आज काही महत्त्वाच्या व्यक्तींसोबत चर्चा होईल. ही चर्चा नवीन यश मिळविण्याचा मार्ग देखील बनेल. मात्र कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी संबंधित योजनांचा पुनर्विचार करा. एक छोटीशी चूकही तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. व्यवसायात केलेली बदलाची धोरणे लवकरात लवकर लागू करा. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या समस्या सोडवता येतील.

सिंह : आज घरातील नूतनीकरणाशी संबंधित योजना असेल. अशावेळी वास्तू नियमांचे पालन करणे अधिक योग्य ठरेल. आर्थिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी बजेट राखणे आवश्यक आहे. मौल्यवान वस्तू हरवल्याने घरात तणावाचे वातावरण राहील. मालमत्तेवरुन भावासोबत काही प्रकारचा वाद होऊ शकतो. व्यवसायात अधिक व्यस्त राहाल.

कन्या : प्रॉपर्टीशी संबंधित न्यायालयीन किंवा प्रलंबित काम हातात सोडवता येईल. मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. कोणतीही कृती करताना सावधगिरी बाळगा. छोट्या चुकांमुळे मोठे नुकसान होऊ शकते, असा सल्‍ला श्रीगणेश सांगतात. आपल्या योजना कोणासमोर उघड करू नका. घरातील वातावरण आनंददायी राहील. खाण्याकडे दुर्लक्ष केल्यास त्रास होण्‍याची शक्‍यता.

तूळ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीचे ऐका. घरातील कोणतीही मागणी कामे पूर्ण करण्याची योजना असेल. तुमच्या निष्काळजीपणामुळे जवळच्या नातेवाईकाशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्‍या. घरातील ज्‍येष्‍ठांच्‍या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. यंत्र आणि लोखंडाशी संबंधित व्यवसायात यावेळी लाभदायक यश मिळू शकते. पती-पत्नीच्या नात्यात सहकार्य राहील.

वृश्चिक : आज धार्मिक संस्थांशी संबंधित सेवा-कार्यात रस घेतल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. वाहन खरेदीच्‍या विचारात सध्या टाळा. आर्थिक बाबी सध्या सामान्य राहतील. अनावश्यक खर्चात कपात करा. व्यवसायात आज जास्त मेहनत करावी लागेल. एकाचवेळी अनेक समस्या निर्माण होतील. पती-पत्नीच्या सहकार्याने एकमेकांचा आत्मविश्वास कायम राहील. ॲलर्जीशी संबंधित अस्वस्थता आणि ताप असू शकतो.

धनु : आज शारिरीक आणि मानसिक आराम मिळण्यासाठी काही वेळ धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात व्यतीत होईल, असे श्रीगणेश सांगतात. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा गांभीर्याने विचार करा. कोणत्याही प्रकारचे करार करताना सावधगिरी बाळगा. छोट्याशा चुकीचे मोठे परिणाम होऊ शकतात. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्‍या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मकर : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्हाला एखाद्या गरजू मित्राची मदत करावी लागेल. मुलांना त्‍यांच्‍या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. त्यांचा आत्मविश्वास वाढेल. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. व्यवसाय क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये आज व्यत्यय येऊ शकतो.

कुंभ : आज अनुकूल ग्रहमान तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास टिकवून ठेवेल, असे श्रीगणेश सांगतात. तुमची प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक समस्यांमुळे चिंता राहील. मात्र ही समस्‍या अल्‍पकाळासाठी असेल. कुटुंबातील मोठ्यांचा सल्ला घ्या. व्यवसायात नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे.

मीन : दैनंदिन दिनचर्येत काही बदल करण्यासाठी आज आवडीच्या कामांमध्ये वेळ घालवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कौटुंबिक वातावरणातही सकारात्मक बदल घडतील. आर्थिक व्‍यवहार जपून करा. व्यवसायाशी संबंधित कोणतेही काम किंवा पैशाचे व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. पती-पत्नीच्या नात्यात मतभेद होऊ शकतात.

Back to top button