आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत वडणगेच्या प्रेरणाला ब्राँझ | पुढारी

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत वडणगेच्या प्रेरणाला ब्राँझ

वडणगे : पुढारी वृत्तसेवा : श्रीलंका येथे झालेल्या लिनिंग श्रीलंका इंटरनॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत वडणगे येथील राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रेरणा आळवेकर हिने मृण्मयी देशपांडे हिच्या साथीने बैडमिंटन डबल्स प्रकारात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझ पदक पटकावले.

प्रेरणा कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिच्या या यशात संस्थेचे चेअरमन ॲड. कापसे, प्राचार्य लोखंडे सर, मंत्री चंद्रकांत पाटील, सेव्हन मॉर्निंग बॅडमिंटन क्लब कोल्हापूर, दिलीप चिटणीस, बेडेकर परिवार, रेवती शेळके यांचे आर्थिक साहाय्य तसेच बाळासाहेब यादव, प्रशिक्षक तन्मय करमरकर, अभिमन्यू भनगे, हर्षल तेलवेकर, डॉ. रोहित पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा : 

Back to top button