Shreyas Iyer : ‘रणजी’ टाळण्यासाठी श्रेयस खोट बोलतोय? : ‘एनसीए’ने केला ‘हा’ खुलासा…

Shreyas Iyer : ‘रणजी’ टाळण्यासाठी श्रेयस खोट बोलतोय? : ‘एनसीए’ने केला ‘हा’ खुलासा…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू देशांतर्गत किक्रेटकडे दुर्लक्ष करत आहेत, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी नुकतेच स्‍पष्‍ट केले आहे. यानंतरही टीम इंडियाचा यष्‍टीरक्षक इशान किशन रणजी स्‍पर्धेपासून दूर आहे. श्रेयस अय्यरला खराब फॉर्ममुळे इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांमधून संघातून वगळण्यात आले होते. यावेळी त्याला रणजी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, पाठदुखीचे कारण देत श्रेयस रणजीपासून दूर राहिला होता. आता बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याच्या दुखापतीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. (Shreyas Iyer)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'बीसीसीआय'ला लिहिलेल्या पत्रात 'एनसीए'ने श्रेयसला फिट घोषित केले आहे. श्रेयसने रणजीमध्ये न खेळण्यासाठी कारण देत दुखापतीचे नाटक करत असल्‍याचे काही चाहत्यांनी साेशल मीडियावर म्हटलं आहे. (Shreyas Iyer)

श्रेयसला नवीन दुखापत नाही

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे क्रीडा विज्ञान आणि औषध विभागाचे प्रमुख नितीन पटेल यांनी श्रेयसला कोणतीही नवीन दुखापत झालेली नाही. तो तंदुरुस्त असल्याची पुष्टी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर पाठदुखीमुळे बडोद्याविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याला मुकला आहे. नितीन पटेल यांच्या मते, अय्यरला कोणतीही दुखापत नाही. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी तो निवडीसाठी उपलब्ध आहे. शुक्रवारी (दि.२३) मुंबईचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना बडोद्याविरुद्ध होणार आहे.

जय शहा यांनी दिला होता इशारा

गेल्या आठवड्यात 'बीसीसीआय'चे सचिव जय शाह यांनी खेळाडूंना इशारा दिला होता की, केंद्रीय करार असलेल्या क्रिकेटपटूंनी रणजी ट्रॉफी न खेळल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. मानसिक थकव्यामुळे यष्टिरक्षक इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौरा मध्यंतरी सोडला होता. यानंतर झारखंडकडून त्याला रणजी खेळायलाही मिळाले नाही. सध्या तो बडोद्यात हार्दिक पांड्यासोबत आयपीएलची तयारी करत आहे.

श्रेयसला बडोद्याविरुद्ध खेळण्यास सांगितले होते

NCA कडून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने श्रेयस अय्यरला रणजी खेळण्यास सांगितले आहे. श्रेयस याआधी पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षीच्या आयपीएलला मुकला होता. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चे नेतृत्व करण्याची शक्यता आहे.

कसोटीत श्रेयस खराब फॉर्म

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर अय्यरला संघातून वगळण्यात आले. जय शहा यांनी दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की, कोणताही केंद्रीय करार असलेल्या खेळाडूने देशांतर्गत स्पर्धा खेळून आपल्या खेळात सुधारणा केल्याशिवाय निवडकर्त्यांकडून भविष्यात त्याचा विचार केला जाणार नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीची चांगली सुरुवात केल्यानंतर श्रेयसला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी संघर्ष करावा लागला. इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या चार डावांत त्याने २६ च्या सरासरीने १०४ धावा केल्या.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news