Amal mahadik : कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीतून माघारीनंतर अमल महाडिक म्हणतात.. | पुढारी

Amal mahadik : कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीतून माघारीनंतर अमल महाडिक म्हणतात..

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर विधानपरिषदेसाठी काँटे की टक्कर लढत होणार अशी चर्चा सुरू होती. परंतु कोल्हापूर विधान परीषद बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाले. सतेज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. (Amal mahadik)

दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. वरिष्ठांच्या निर्देशप्रमाणे अमल महाडिक हे आपल्या समर्थकांसह आज (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचले.

Amal mahadik : दिल्लीतून सुत्रे फिरली आणि बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. त्यानुसार कोल्हापूर विधान परिषदेतील भाजपचे उमेदवार अमल महाडिक व डमी उमेदवार शौमिका महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना भाजपकडून करण्यात आली. परिणामी काँग्रेसचे उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवड झाली.

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमल महाडिक यांनी आपली पहिली प्रतिक्रीया दिली, मी भाजपचा सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.

मला पक्षाकडून आदेश आल्याने विधान परिषदेची निवडणूक लढवत होतो.

पक्षाच्या आदेशानुसार आम्ही निवडणूकीला सामोरे जात होतो. दरम्यान आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा व पक्षाचा आदेश मान्य करून माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. असे अमल महाडिक यांनी सांगितले.

धनंजय महाडिक म्हणाले

आगामी कालखंडात राज्यात अनेक निवडणूका होत आहेत. त्यामुळे राज्यात सलोखा राहावा यासाठी विरोधी देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी या दृष्टीकोनातून चर्चा झाली आणि त्यानुसार निर्णय झाला आहे.

भाजपामध्ये आम्ही सगळी मंडळी आतापर्यंत महाडिक गट म्हणून इथे कार्यरत होतो. आज आम्ही सगळी मंडळी भाजपासोबत आहोत.

भाजपामध्ये काम करत आहोत, मी प्रवक्ता आहे आणि सदस्य संख्या या निवडणुकीत आमच्याकडे चांगली झालेली होती.

तरी देखील पक्षाचा आदेश म्हणून आपण इथे थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे.

इथून पुढे सर्व निवडणुका भाजपाच्या झेंड्याखाली आम्ही लढवणार आहोत. असंही यावेळी धनंजय महाडिक यांनी बोलून दाखवले.

Back to top button