Sharad Pawar : आता दिलेलं मराठा आरक्षण कसं टिकणार याबदद्ल शंका : शरद पवार | पुढारी

Sharad Pawar : आता दिलेलं मराठा आरक्षण कसं टिकणार याबदद्ल शंका : शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासंदर्भात माझ्यामनात शंका आहे. २०१४ मध्येही मराठ्यांना आरक्षण दिले होते पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आता दिलेलं आरक्षण टिकणार नाही. ते कसं टिकणार याबद्दल शंका आहे. असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. आज (दि.२१) ते कोल्हापुरमधुन माध्यमांशी बोलत होते. (Sharad Pawar)

अशोक चव्हाणांच्या भुमिकेवर म्हणाले, मला…

“मला कोणीही काँग्रेस सोडायला सांगितले नाही. हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. भाजपमध्ये बिनशर्त प्रवेश केला आहे. येथेही प्रामाणिक आणि सकारात्मक काम करणार” असं म्हणतं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे.  ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी आज (दि.२१) संवाद साधत होते. ते म्हणाले, “अशोक चव्हाण यांच उदाहरण सगळ्यांना आश्चर्यकारक होते. पण, मला तितके आश्चर्यकारक वाटल नाही. भाजपनं एक व्हाईट पेपर काढला होता. त्यात आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाणांचा उल्लेख होता. त्यानंतर  वाटायला लागलं की ही एकप्रकारे धमकी असण्याची शक्यता आहे. या धमकीचे परिणाम नंतर झाले,” असं खोचक विधान शरद पवार यांनी केलं आहे.

Sharad Pawar :  आरक्षणा संदर्भात माझ्यामनात शंका

मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय, निमशासकीय सेवांमध्ये १० टक्के आरक्षण देणारे विधेयक मंगळवारी (दि. २०) विधानसभेनंतर विधानपरिषदेतही मंजूर झाले. यावर बोलत असताना शरद पवार म्हणाले, “मराठ्यांना दिलेलं १०% आरक्षण टिकेलं का? कायदे तज्ज्ञांनाही हे आरक्षण टिकेलं का याबद्दल शंका आहे. मराठा आरक्षणासंदर्भात माझ्यामनातही शंका आहे. हा प्रश्न सुटला मला याचा आनंदच आहे. पण २०१४ मध्येही असं विधेयक पास करुन मराठ्यांना आरक्षण दिले होते पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आता दिलेलं आरक्षण टिकणार नाही. ते कसं टिकणार याबद्दल शंका माझ्या मनात आहे. विरोधाला विरोध नको म्हणून हे विधेयक मंजुर झालं आहे.

दिल्लीत शेतकरी आंदोलन बाबतीत बोलत असताना ते म्हणाले की,” पंजाब हरियाणातील शेतकरी अस्वस्थ आहे. तर एकीकडे सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. सरकारने संमजपणाने भूमिका घ्यावी. कडाक्याच्या थंडीत सरकारने शेतकऱय़ांनी आंदोलन करणे  सोपं नाही.

हेही वाचा 

Back to top button