CM Eknath Shinde On Thackeray | भोळ्या चेहऱ्यामागे अनेक भूमिका; मुख्यमंत्री शिंदे यांची ठाकरेंवर सडकून टीका | पुढारी

CM Eknath Shinde On Thackeray | भोळ्या चेहऱ्यामागे अनेक भूमिका; मुख्यमंत्री शिंदे यांची ठाकरेंवर सडकून टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : त्यांच्या ‘या’ भोळ्या चेहऱ्यामागे अनेक भूमिका आहेत, त्यांना सत्तेचा मोह हा २००४ पासूनच होता. बाळासाहेब आमच्यासाठी दैवत आहेत. पण त्यांना बाळासाहेब नको आहेत तर केवळ पैसा पाहिजे होता, अशी सडकून टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. कोल्हापूर येथील शिवसेना महाअधिवेशनात ते आज (दि.१७) पदाधिकाऱ्यांना संबोधित करत आहेत. (CM Eknath Shinde On Thackeray)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरेंवर टीका करताना पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या इनोसंन्ट चेहऱ्यामागे अनेक भूमिका आहेत. त्यांनी शिवसैनिक, जनता, भाजप आणि पंतप्रधान मोदींना फसवलं. एकदा नाही तुम्ही दोनवेळा त्यांनी जनतेला फसवलंय, असा आरोप देखील मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर केला आहे. यावरूनच किती मुखवट्यांआड तुम्ही लपणार आहात? असा सवाल देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला या महाअधिवेशनात बोलताना केला. (CM Eknath Shinde On Thackeray)

‘यांना’ सत्तेचा मोह २००४ पासूनच…- मुख्यमंत्री शिंदे

बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होते. वेगळे होताना छातीवर दगड ठेवावा लागला. सत्तेचा मोह त्यांना २००४ पासूनच होता, याला अर्जुन खोतकर यांच्यासह अनेकजण साक्षी आहेत, असेदेखील शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. (CM Eknath Shinde On Thackeray)

वारसा सांगणाऱ्यांनी, एकदा आरसा पाहावा

२०१९ ला लग्न एकासोबत, संसार दुसऱ्यासोबत आणि… अशी टीकादेखील केली. भाजपसोबत युती होती तर सत्ता स्थापन करायला हवं होतं. सोडून जाणारे नेते का गेले हे त्यांनी एकदा तपासून पहावं. हे सगळे नेतेसोबत असते तर शिवसेनेची सत्ता अनेकवेळा आली असती. २, ४ टकल्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा होत नाही. पुत्र प्रेमापोटी ध्रुतराष्ट्रालाही मागे पाडले. त्यामुळे वारसा सांगणाऱ्यांनी एकदा आरसा पाहावा, स्वत:चे कर्तव्य पहिले पाहावे, असेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

‘यांना’ कदमांचाही मनोहर जोशी करायचा होता

मनोहर जोशींना स्टेजवरून कोणी खाली उतरवलं. त्यांचे घर जाळायला कोणी पाठवले. गजानन किर्तीकर यांना कितीवेळा पैशासाठी घरी परत पाठवले. रामदास कदम यांचा देखील त्यांना मनोहर जोशी करायचा होता, असे गौप्यस्फोटदेखील शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.

माझ्या अर्थी CM म्हणजे कॉमन मॅन

शेती करण्यासाठी मी हेलिकॅप्टरचा वापर करतो, अशा माझ्यावर अनेक टीका करण्यात आल्या. मला हेलिकॅप्टरने शेती करणारा म्हणून हिणवण्यात आले. पण तुम्ही कोरोना काळात काय केले असा सवाल देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना केला. कोरोना काळात तुम्ही फेसबुकवर खेळायचा, आम्ही मात्र ‘फेस टू फेस; खेळतो. त्यामुळे माझ्या अर्थी CM म्हणजे कॉमन मॅन. कोणत्याही धमक्यांना मी घाबरत नाही. हा एकनाथ शिंदे घाबरणारा नाही. अशी टीका देखील शिंदे यांनी ठाकरेंवर केली.

गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक तयार करा- शिवसेना कार्यकर्त्यांना आवाहन

गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक तयार करा. तिकीट न मिळाल्यास नाराज होऊ नका. अनेक निवडणुका असतात. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पैशातून लोकांचे प्रेम मिळत नाही. कार्यकर्ताच नेत्याचं ब्रँडिंग करू शकतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले आहे. ते कोल्हापूर येथील शिवसेनेच्या महाधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

हेही वाचा:

Back to top button