Ichalkaranji Murder Case : इचलकरंजीत स्मशानभूमीमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा खून | पुढारी

Ichalkaranji Murder Case : इचलकरंजीत स्मशानभूमीमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा खून

इचलकरंजी: पुढारी वृत्तसेवा : येथे शांतीनगरमधील एका स्मशानभूमीमध्ये एका युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे रविवारी दुपारी उघडकीस आले. प्रशांत भैरू कुराडे (वय 25, रा.इंदिरानगर गल्ली नं. 3) असे त्याचे नाव आहे. तो प्रोसेस कामगार आहे. मृतदेह दगडाने ठेचून पुन्हा मृतदेहावर मोठमोठे दगड, सिमेंटचे तुकडे ठेवण्यात आले होते. खुनाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम गावभाग पोलिसांकडून सुरू आहे. खुनाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. Ichalkaranji Murder Case

शांतीनगर परिसरात कत्तलखान्याजवळ कोल्हाटी डोंबारी समाजाची स्मशानभूमी आहे. यामध्ये एका युवकाचा मृतदेह पडल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह पथकाने धाव घेतली. दगड तसेच सिमेंट काँक्रीटच्या तुकड्यांनी डोके ठेचूने निर्घृण खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. मृतदेह लपवण्यासाठी मृतदेहावर मोठा दगड, सिमेंटचे तुकडे, खांब यांचा थरच टाकण्यात आला होता. रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान होते. Ichalkaranji Murder Case

मात्र, काही तासातच मृताची ओळख पटली. प्रशांत कुराडे असे त्याचे नाव आहे. त्याच्या बहिणीने मृतदेह ओळखला. याची माहिती गावभाग पोलिसांनी दिली. मात्र, प्रशांतचा खून कोणत्या कारणातून झाला याची स्पष्टता होवू शकलेली नाही. घटनास्थळी उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी भेट देवून पाहणी केली. पोलिसांना घटनास्थळी नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळले असून ते जप्त करण्यात आले आले. इंदिरा गांधी इस्पिळात उत्तरीय तपासणी करण्यात आली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा 

Back to top button