Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची शाहूवाडीत आढावा बैठक

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची शाहूवाडीत आढावा बैठक
Published on
Updated on

विशाळगड: पुढारी वृत्तसेवा : मतदारांमध्ये जनजागृती, नवमतदार नोंदणी, निवडणुकांमध्ये अधिकाधिक पारदर्शिता, आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, गतिशील कामे यासोबतच राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येक कर्मचा-यांनी आपले दायित्व पूर्ण करावे, निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सेक्टर अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिल्या.  Lok Sabha Election

शाहूवाडी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, शाहूवाडी – पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, निखिल खेमणार, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी मलकापूर अमित भोसले, आरोग्य अधिकारी एच. आर. निरंकारी, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. Lok Sabha Election

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की, आयोगाने आदर्श आचारसंहिता पालन व्हावे, या दृष्टीकोनातून विविध सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्या सूचनांनुसार निवडणूक निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी कार्य करावे. निवडणूक आयोगापर्यंत प्राप्त तक्रारींवर तक्रारदारांना तत्काळ प्रतिसाद देऊन तक्रारींचा निपटारा करावा. मतदानपूर्व आणि मतदानानंतर करावयाची सर्व कामे वेळेत व नियोजनपूर्वक करावीत. पोलिस प्रशासनाने उत्सव, सण आणि जयंती व निवडणूक आदींबाबत पूरक पोलिस बंदोबस्त ठेवावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, असे नियोजन करावे.

ग्रामीण भागातल्या शेवटच्या मतदारांपर्यंत मतदान करण्याबाबत जनजागृती करावी. मतदान केंद्रांवर संपर्क व्यवस्था, वीज आणि पाण्याबरोबरच महिला आणि दिव्यांग मतदारांना आवश्यक व्यवस्था, सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांनी कार्यवाही पार पाडावी. मतदारांना मतदान करताना आवश्यक असलेल्या ओळख पत्रांबाबतही जागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले की, कोणत्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडणार नाही, मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. सर्व मतदान केंद्रांचे वस्तुनिष्ठ माहिती घेऊन महसूल व पोलीस विभागाने त्यांचे सर्वेक्षण करावे. मतदान केंद्रांवर काही त्रुटी असल्यास सोयी सुविधांचा अभाव याबाबत माहिती घ्यावी. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान केंद्राची रचना असेल, असे पहावे.

इंटरनेट, फोन कनेक्टीव्हिटीच्या दृष्टीने शॅडो झोनबाबतची माहितीही घेण्यात यावी म्हणजे त्या अनुषंगाने इंटरनेट सुविधेचे तजवीज करता येईल. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. तृतीय पंथी, दिव्यांग यांच्या नोंदणीसाठी प्रत्यक्ष भेटीतून त्यांचे अर्ज भरुन घ्यावे. या कामास प्राधान्य द्यावे. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी सर्व सोयी उपलब्ध करुन द्याव्यात. १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांच्या नोंदणीसाठी प्रयत्न करावेत. तालुक्यात २ लाख ९२ हजार ६९१ मतदार आहेत. गत निवडणुकीत ज्या ठिकाणी मतदान कमी झाले आहे, त्या ठिकाणी जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावेत, विशेष मोहिमा राबवाव्यात, स्वीप कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवावा. वाहनांची उपलब्धता, दिव्यांगांच्या नोंदणीस प्राधान्य, पूर्वीच्या निवडणुकांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची निर्गती करण्यात यावी, अशा सुचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी केल्या.

लोकसभा मतदार संघात मतदार, नवमतदारांमध्ये केलेली जागृती, अधिकारी – कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, स्वीप कार्यक्रम, दिव्यांग, गरोदरमाता, स्तनदा मातांसाठी मतदानाच्या दिवशी केलेली व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, निवडणूक कामासाठी असलेले मनुष्यबळ, कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस कूमक, आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी स्थापन केलेले कक्ष, कक्षांचे कामकाज, कक्षांकडून करण्यात आलेली कार्यवाही आणि निवडणुकीशी संबंधित सर्व कामकाजाचे नियोजन व केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर वृत्तांत कार्यालयास द्यावा, अशा सूचना यावेळी  जिल्हाधिकारी येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्याना दिल्यात.

Lok Sabha Election स्ट्राँग रूमची केली पाहणी

शाहुवाडीतील जुने धान्य गोडाऊन स्ट्राँग रुमसाठी वापरले जाते. ते सुस्थितीत आहे की नाही याची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. यावेळी काही त्रुटी त्यांनी नजरेत आणून त्या सुस्थितीत करून घ्याव्यात, अशा सूचना संबंधितांना त्यांनी केल्या.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news