कोल्हापूर : आजरा कारखान्याची फसवणूक केल्याप्रकरणी ९ जणांना एक वर्षाची शिक्षा | पुढारी

कोल्हापूर : आजरा कारखान्याची फसवणूक केल्याप्रकरणी ९ जणांना एक वर्षाची शिक्षा

आजरा: पुढारी वृत्तसेवा : आजरा साखर कारखान्यास सन २०१८ – २०१९ या गळीत हंगामात ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा पुरविण्यासाठी घेतलेल्या अॅडव्हान्स रक्कमेतील थकीत रक्कमेच्या फेडीपोटी बोगस धनादेश दिले. या प्रकरणी आजरा न्यायदंडाधिकारी एस्. पी. जाधव यांनी नऊ जणांना एक वर्षाची कैद व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सागर भुजंगा सुतार (रा. टिक्केवाडी), हरीबा ईश्वर माने (रा.मडिलगे बु.) सुभाष साताप्पा पाटील (रा.कोनवडे), सुनिल बापू पाटील (रा.कोनवडे), पांडूरंग विष्णू पाटील (रा.मुदाळ), श्रीधर हरीबा माने (रा.मडिलगे बु.) नामदेव कुंडलिक पोवार (रा. पळशिवणे), रंगराव पांडूरंग आसबे (रा. टिक्केवाडी), रविंद्र बापूसो नेवगे (रा. आवळी, ता. राधानगरी) या आरोपींनी कारखान्यास सन २०१९ मध्ये थकीत रक्कम फेडण्यासाठी चेक दिले होते.

सदरचे धनादेश न वटल्याने त्यांच्याविरुध्द आजरा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे स्वतंत्ररित्या खटले दाखल केले होते. कारखान्यास दिलेल्या धनादेश रक्कमे इतकी सर्वांची मिळून २८ लाख ७५ हजार इतकी नुकसान भरपाई कारखान्यास देण्याचा आदेश केला आहे. फिर्यादी कारखान्याचे वकील म्हणून अॅड.बी. के. देसाई यांनी काम पाहिले. तर फिर्यादी म्हणून अनिल देसाई यांनी केसीस दाखल केल्या. राजकुमार कदम लिगल क्लार्क यांनी जाबजबाब दिले.

हेही वाचा 

Back to top button