गडहिंग्लजमधील तरूणाचा हुबळीजवळ अपघाती मृत्यू | पुढारी

गडहिंग्लजमधील तरूणाचा हुबळीजवळ अपघाती मृत्यू

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा येथील भगतसिंह रोडवर राहणार्‍या आशिष वामन सुतार (वय ३३) या युवकाचा हुबळीजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आशिष हा बंगळुरु येथे डिझायनर म्हणून खासगी कंपनीत कार्यरत होता. सध्या घरच्यांकडून त्याच्या विवाहासाठी स्थळे पाहण्याचे प्रयत्न सुरु होते. याच निमित्ताने तो गडहिंग्लजला येत होता.

हुबळीदरम्यान सकाळी त्याच्या दुचाकीला अपघात झाला. सुतार कुटुंबीय हे मूळचे कानोली (ता. आजरा) येथील आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते गडहिंग्लजमध्ये स्थायिक झाले आहेत. आशिष हा कौशल्यपूर्ण डिझायनर होता. बंगळुरू येथील कंपनीत सिनिअर डिझाईन स्पेशालिस्ट म्हणून तो कार्यरत होता. त्याच्या अपघाती निधनाने कुटुंबीयांसह मूळ गावी कानोलीकरांनाही धक्का बसला आहे. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

हेही वाचा : 

Back to top button