Jitendra Awhad On Rahul Narvekar : ‘यापेक्षा मोठी शोकांतिका काय’; राहुल नार्वेकरांबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट चर्चेत | पुढारी

Jitendra Awhad On Rahul Narvekar : 'यापेक्षा मोठी शोकांतिका काय'; राहुल नार्वेकरांबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून राहुल नार्वेकर यांची १० व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मात्र, राहुल नार्वेकर यांची निवड होणं यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते? असे मत शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भातील एक्स पोस्ट त्यांनी केली आहे. (Jitendra Awhad On Rahul Narvekar)

पुढे आव्हाड यांनी म्हटले आहे की, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तत्त्व आणि नैतिकतेला मूठमाती देऊन जी व्यक्ती सर्व पक्षांसोबत घरोबा करून आलेली आहे. त्यांना यापदी नेमणे म्हणजे संवैधानिक मूल्यांची सर्वात मोठी थट्टा असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. (Jitendra Awhad On Rahul Narvekar)

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही नियुक्ती केलेली आहे. हाजीहाजी करण्यापलिकडे बिर्ला यांची राजकीय समज काय आहे ते आपण खासदारांच्या निलंबन प्रकरणावरून पाहिलंच आहे. त्यामु़ळे ही संशोधन समिती लोकप्रतिनिधींची काय चिकित्सा करणार हे वेगळं सांगायला नको. असे देखील आव्हाड यांनी म्हटले आहे. (Jitendra Awhad On Rahul Narvekar)

हेही वाचा:

Back to top button