कोल्‍हापूर : नेर्ले गावाजवळ गव्यांच्या कळपाचा बिनधास्त फेरफटका | पुढारी

कोल्‍हापूर : नेर्ले गावाजवळ गव्यांच्या कळपाचा बिनधास्त फेरफटका

सरूड : पुढारी वृत्तसेवा शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावाजवळ जंगली गव्यांच्या कळपाने (शनिवार) सकाळी बिनधास्त फेरफटका मारला. वारणा उजवा कालव्याच्या भराव्यावरून डौलात चालणारे १५ हून अधिक लहान मोठे गवे सिमेंटच्या साकवावरून आल्याड-पल्याड करीत जणू जंगलाबाहेरचा निवांतपणाच अनुभवत होते. मात्र, भल्या सकाळी गव्यांचा हा भलामोठा कळप पाहून परिसरातील रहिवासी नागरिकांच्या उरात धडकी भरली.

दरम्यान, अमेणीच्या जंगलातून साताळीच्या डोंगरातून अवतरलेला हा गव्यांचा कळप अधूनमधून या परिसरात डेरेदाखल होत असल्याचे एका प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्याने सांगितले. याचवेळी लहान बच्चेकंपनी सोबत घेऊन फिरणाऱ्या गव्यांच्या कळपाचे वेगळेपणही या निमित्ताने संबंधित शेतकऱ्याने अधोरेखित केले. ऊस, मक्याचे पीक गव्यांच्या कळपाने लक्ष्य केल्याच्या घटना घडत असल्‍याने शेतकरी चिंताग्रस्‍त आहेत.

हेही वाचा : 

Back to top button