

बिद्री; पुढारी वृत्तसेवा : येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी फत्तेसिंग रामसिंग भोसले-पाटील (नरतवडे) यांची निवड करण्यात आली. कारखान्याच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. निवडबाबत झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील होते.
बिद्री साखर कारखान्याची सन २०२३ ते २८ या कालावधीसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. त्यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील, बिद्रीचे अध्यक्ष के .पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजय घाटगे, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्व २५ जागा जिंकून सत्ता कायम राखली.
निवडणूकी दरम्यान, राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील फत्तेसिंग भोसले- पाटील यांचे सताधारी आघाडीतून उमेदवारीसाठी नाव जाहीर केले आणि लगेचच उमेदवारीचा पत्ता कट झाला होता. त्यामुळे समर्थकांतून मोठी नाराजी व्यक्त केली जात होती. नाराजी दूर करीत त्यांना स्वीकृत करण्याचा शब्द आघाडीच्या नेतेमंडळींनी दिला होता. आज संचालक मंडळाच्या बैठकीत फत्तेसिंग भोसले यांची स्वीकृत संचालकपदी निवड केली. यावेळी उपाध्यक्ष गणपतराव फराकटे, सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर.डी.देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
हेही वाचा :