कांडगावातील तरूणाचा प्रामाणिकपणा; रस्त्यात सापडलेले पैसै मालकाचा शोध घेऊन केले परत | पुढारी

कांडगावातील तरूणाचा प्रामाणिकपणा; रस्त्यात सापडलेले पैसै मालकाचा शोध घेऊन केले परत

देवाळे: पुढारी वृत्तसेवा : आजच्या जमान्यातही समाजात प्रामाणिकपणा, माणुसकी टिकून आहे याची प्रचिती देणारे उदाहरण नुकतेच कांडगाव (ता. करवीर) येथील तरुणाच्या कृत्यातून पहायला मिळाले. पैशांनी भरलेले पाकीट रस्त्यावर पडलेले मिळाल्यानंतर तरुणाने मिळालेल्या पैशांचा मोह न ठेवता त्या पाकिटाच्या मूळ मालकाचा शोध घेत त्यास पाकीट परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. महेश वळगड्डे असे तरुणाचे नाव असून तो कांडगावचा रहिवासी आहे.

हसूरहून कोल्हापूरला जात असताना गोरक्ष पाटील यांचे कांडगाव गावच्या कमानी जवळ कोल्हापूर – राधानगर रस्त्यावरती पैशाचे पाकीट पडले असल्याचे त्यांना दिसले. रस्त्यावर पडलेले पैसे जमा करत त्यांनी ते पाकीट उचलून घेतले. त्यानंतर गोरक्ष पाटील यांना पाठीमागून मोटरसायकल पाठवून पैसे सापडल्याचा निरोप दिला. गोरक्ष वाशिहून निरोप मिळाल्यानंतर परत आले व महेश यांनी त्यांना पैसे परत केले.

हेही वाचा : 

Back to top button