कोल्हापूर : आजरा कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची गुरुवारी निवड | पुढारी

कोल्हापूर : आजरा कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची गुरुवारी निवड

आजरा: पुढारी वृत्तसेवा : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड गुरुवारी (दि. २८) होणार आहे. अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष वसंतराव धुरे, मुकुंदराव देसाई व विष्णूपंत केसरकर यांची नावे चर्चेत आहेत. तर उपाध्यक्षपदासाठी एम. के. देसाई यांचे नाव निश्चित मानले जात आहे.

गवसे (ता. आजरा) येथील कारखाना कार्यस्थळावरील सभागृहात निवड प्रक्रिया पार पडेल. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक साखर उपसंचालक कोल्हापूर विभाग गोपाळ मावळे हे निवड सभेच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने निर्विवाद सत्ता मिळवली. कारखाना आर्थिक संकटात असल्याने कारखान्याच्या पदाधिकारी निवडीला महत्व प्राप्त झाले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. याबाबत सर्व संचालकांशी चर्चा केली जाणार असून मुलाखतीतून निवड होईल. निवड सभेच्या आदल्यादिवशी बुधवारी याबाबत बैठक होणार आहे. साखर व्यवसायातील अभ्यासू व ज्येष्ठ संचालकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये धुरे यांचे नाव आघाडीवर आहे.

हेही वाचा 

Back to top button