Pudhari Shopping and Food Festival : पुढारी शॉपिंग आणि फूड फेस्टिव्हलचे आज उद्घाटन | पुढारी

Pudhari Shopping and Food Festival : पुढारी शॉपिंग आणि फूड फेस्टिव्हलचे आज उद्घाटन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लज्जतदार, चमचमीत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेत मनसोक्त शॉपिंगची संधी देणार्‍या ‘पुढारी कस्तुरी क्लब आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’चे उद्घाटन शुक्रवारी (दि. 22) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. रॉनिक स्मार्टचे संचालक तानाजी पोवार, सोसायटी चहाचे असि. मार्केटिंग मॅनेजर शशिकांत ठाकरे व क्रेझी आईस्क्रिम, सांगलीचे बिझनेस हेड प्रशांत पाटील उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 ते रात्री 9 या कालावधीत मंगळवार (दि. 26) पर्यंत हा फेस्टिव्हल चालणार आहे. (Pudhari Shopping and Food Festival)

या फेस्टिव्हलमध्ये चारचाकी गाड्यांपासून ते फर्निचरपर्यंत, किचन ट्रॉली, इलेक्ट्रॉनिक्स, गारमेंट, होम डेकोर, आयुर्वेदिक प्रॉडक्ट, सौंदर्य प्रसाधने, चटण्या, लोणचे, मसाल्यांचे पदार्थ, प्लास्टिकच्या विविध वस्तू, ब्रँडेड शूज, ज्वेलरी अशा उत्पादनांचे स्टॉल्स आहेत. व्यावसायिक व खाद्यपदार्थांचे मिळून 130 हून अधिक स्टॉलधारक सहभागी झाले आहेत. रॉनिक स्मार्ट वॉटर हीटर व सोसायटी चहा हे सहप्रायोजक असून, क्रेझी आईस्क्रिम पार्टनर आहेत. (Pudhari Shopping and Food Festival)

खवय्यांसाठी पर्वणी

या शॉपिंग आणि खाद्य महोत्सवामध्ये नॉनव्हेज खवय्यांसाठी तांबडा-पांढरा रस्सा, वडा कोंबडा, तंदूर-कबाब, चिकन 65, खिमा पराठा, फिशचे नावीन्यपूर्ण प्रकार, सोलापुरी मटण-चिकन थाळी तसेच शुद्ध शाकाहारी खवय्यांसाठी थालीपीठ, इडली – उडीद वडा, चौपाटी पदार्थ, साऊथ इंडियन, पिझ्झा सँडविचसारखे फास्ट फूड, स्प्रिंग पोटॅटो असे अनेकविध पदार्थांची मांदियाळी इथे असणार आहे.

मनोरंजनाचे खास आकर्षण

तोल न जाता उंच काठीवर चालणारा स्टिक मॅन, हवेत अनेक वस्तू एकाच वेळी खेळवत राहणारा जगलर तसेच रंगीबेरंगी जोकर हा आबालवृद्धांचा कुतूहलाचा विषय आहे. कराओके ट्रॅकवरील गीतांचा कार्यक्रम, 360 अंशांमध्ये फिरणारा खास सेल्फी पॉईंट अशी आकर्षणे असणार आहेत.

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कस्तुरी क्लबच्या सदस्या व बचत गटाच्या महिलांचे विविध स्टॉल्स या फेस्टिव्हलमध्ये लावण्याची संधी देण्यात आली आहे.

ऑटोमोबाईल्ससाठी विशेष दालन असून, गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांसाठी वेगळे विभाग आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- 9834433274.

हेही वाचा :

Back to top button