कोल्हापूर : अब्दुल लाट येथे ‘स्वाभिमानी’ च्या वतीने इथेनॉल निर्मिती बंदीच्या अध्यादेशाची होळी | पुढारी

कोल्हापूर : अब्दुल लाट येथे 'स्वाभिमानी' च्या वतीने इथेनॉल निर्मिती बंदीच्या अध्यादेशाची होळी

अब्दुल लाट; पुढारी वृत्तसेवा : अब्दुल लाट (ता.शिरोळ) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंदच्या अध्यादेशाची होळी करून आज (दि.८) निषेध व्यक्त करण्यात आला.

केंद्र सरकारने गुरूवारी (दि.७) देशातील सर्व साखर उद्योगांनी ऊसापासून इथेनॉल निर्मिती बंद करावी, असा अध्यादेश काढला आहे. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले इथेनॉल प्रकल्प अडचणीत येणार तर आहेतच तसेच या निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीतुन मिळणारे अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार नाही. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार असून याचा परिणाम ऊसाच्या अंतिम दरावर होणार आहे, असे मत ‘स्वाभिमानी’ चे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडले होते. यामुळे अब्दुल लाट येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या या अन्यायकारी धोरणाचा निषेध करण्यात आला. व शेतकऱ्यांचा रोष सरकार दरबारी पोहचावा, म्हणुन या अध्यादेशाची होळी करण्यात आली.

यावेळी सुमतीनाथ शेट्टी, सुभाष घडसे, शितल कुरणे, रावसाहेब चौगुले, श्रीकांत मगदुम,किरण चौगुले, पोपट आक्कोळे, अनुराग बरगाले, शुभम नाईक, अमित बरगाले, आर.के.गिरमल, सुनिल गुरव, नरसु आवटी, शांतीनाथ कुरुंदवाडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button