कोल्हापूर : सावे ग्रामपंचायत उपसरपंचपदी प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड | पुढारी

कोल्हापूर : सावे ग्रामपंचायत उपसरपंचपदी प्रकाश पाटील यांची बिनविरोध निवड

सरूड : पुढारी वृत्तसेवा : सावे (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रकाश नामदेवराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर संयुक्त गटाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत विजयी जल्लोष साजरा केला. मा. आ. सत्यजित पाटील, आघाडी प्रमुख माजी सभापती नामदेवराव पाटील यांनी नूतन उपसरपंच प्रकाश पाटील यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या 

स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शोभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. ५) दुपारी झालेल्या विशेष सभेत उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली. प्रारंभी प्रकाश पाटील यांनी (शिवसेना) संयुक्त आघाडीच्या वतीने तर विरोधात सुनंदा पाटील यांनी उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. मात्र, सुनंदा पाटील यांनी विहित वेळेत माघार घेतली. यामुळे एकमात्र उमेदवार प्रकाश पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र कुंभार यांनी जाहीर केले.

सहायक निवडणूक अधिकारी तथा ग्रामसेवक योगेश भोसले यांनी सभेचे कामकाज पाहिले. यावेळी प्रदिप पाटील, संतोष भिंगले, सुरेश पाटील, टी. डी. पाटील, गुंगा पाटील, राजाराम चव्हाण, संगीता पाटील, सुवर्णा पाटील, महादेव पाटील, अशोक पाटील, संतोष पाटील, पै.विजय पाटील, संजय धोंगडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button