वर्धापनदिन विशेष : शिवाजी विद्यापीठ ‘लोकल टू ग्लोबल’ | पुढारी

वर्धापनदिन विशेष : शिवाजी विद्यापीठ ‘लोकल टू ग्लोबल’

कोल्हापूर; सचिन टिपकुर्ले : शिवाजी विद्यापीठाचा आज 59 वा वर्धापनदिन साजरा होत आहे. आजपर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या विद्यापीठात शिक्षण घेऊन यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करत विद्यापीठाचे नाव जगभरात पोहोचविले आहे. त्यामुळे लोकल असणार्‍या शिवाजी विद्यापीठ ला आता ‘ग्लोबल टच’ मिळाला आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार करून शैक्षणिक देवाणघेवाण करत उंच भरारी घेतली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या नावलौकिकात दिवसेंदिवस भर पडत आहे.

स्टेडियम : 6, सिंथेटिक ट्रॅक : 1, ओपन जिम : 1, सभागृहे : 7, खुले सभागृह : 1,ओपन थिएटर : 1, सेमिनार हॉल 23, संग्रहालये : 2, अभियांत्रिकी कार्यशाळा : 2, आरोग्य केंद्र : 1, इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर : 5, प्रिंटिंग प्रेस : 1, बगीचे : 37 एकर, रोपवाटिका : 2, कॅम्प्समधील झाडे : 13 हजार 500, बायोगॅस प्लँट : 2, डेटा सेंटर : 2, रेकॉर्डिंग स्टुडिओ 1, सौरऊर्जानिर्मिती : 180 किलो वॅट, स्मार्ट क्लासरूम : 39, सीसीटीव्ही : 646, इंटरनेट कनेक्टिव्हिटी : 3 हजार प्लस, वायफाय झोन्स : 62, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग : 4, जलसंसाधने : पाणी शुद्धीकरण प्रकल्प : 1 (सहा हजार लिटर प्रतितास प्रक्रिया), मातीचे धरण : 3, शेततलाव : 10, पाण्याच्या विहिरी : 9, पृष्ठभाग पाणी साठवण क्षमता : 33 कोटी लिटर

शैक्षणिक : विद्याशाखा : 4, विभाग : 33, अध्यासन : 10, यूजीसी योजना : 4, विविध अभ्यासक्रम : 220, वाचनालये : 3, बोटॅनिकल गार्डन : 1, कम्युनिटी डेव्हल्पमेंट सेंटर : 1, विद्यापीठातील प्रकाशने (पुस्तके) : 118, जर्नल्स : 2, ज्ञान संसाधन केंद्रे : 201, मुद्रित पुस्तके : 2 लाख 76 हजार 429, टायटल्स (शीर्षके) : 2,27,017, विशेष दुर्मीळ संग्रह : 31,404, ब्रेल बुक्स : 590

आयएसओ 9001-2015 प्रमाणपत्रप्राप्त विद्यापीठ

नॅक (बंगळूर) यांच्याकडून चौथ्या पुनर्मूल्यांकन फेरीमध्ये 3.52 सीजीपीए गुणांकनासह अ++ नामांकन. केंद्रीय कार्पोरेट अफेअर्स मंत्रालय यांच्याकडून विद्यापीठाला संशोधन व विकास फाऊंडेशन सेक्शन 8 कंपनी म्हणून मान्यता. ब्रिक्स देशांसाठीच्या टड-इठखउड युनिव्हर्सिटी रॅकिंग 2020 मध्ये विद्यापीठास 251-260 बँडमध्ये स्थान. भारतीय क्रमवारीत प्रतिपेपर सायटेशन या निकषामध्ये द्वितीय स्थान आणि प्रतिसंशोधक पेपर या निकषामध्ये देशात सतरावे स्थान. छखठऋ रँकिंग 2021 मध्ये 101-150 बँडमध्ये स्थान.

अमेरिकेच्या आल्पर डॉजर तथा ए. डी. सायंटिफिक इंडेक्सनुसार वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग या क्रमवारीमध्ये विद्यापीठातील कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्यासह एकूण 48 वैज्ञानिक संशोधकांचा समावेश. ऑक्सफर्ड विद्यापीठाने विश्लेषित केलेल्या जागतिक स्तरावरील 2 टक्के आघाडीच्या संशोधकांच्या क्रमवारीत शिवाजी विद्यापीठाच्या 9 संशोधकांना स्थान. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांचा फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट संशोधनाच्या क्षेत्रात संशोधकांच्या यादीत टॉप 150 मध्ये 147 वा क्रमांक, तर देशात दुसरे स्थान.

शिवाजी विद्यापीठ स्थापना : 18 नोव्हेंबर 1962
कार्यक्षेत्र : कोल्हापूर, सांगली, सातारा
संलग्नित महाविद्यालये : 276
मान्यताप्राप्त संशोधन संस्था : 16

शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू

1) डॉ. आप्पासाहेब पवार
2) बॅ. पी. जी. पाटील
3) प्राचार्य बी. एस. भणगे
4) प्राचार्य आर. के. कणबरकर
5) प्राचार्य के. भोगीशयन
6) प्रा. के. बी. पोवार
7) प्रा. ए. टी. वरुटे
8) प्रा. डी. एन. धनागरे
9) प्रा. एम. जी. ताकवले
10) प्रा. एम. एम. साळुंखे
11) प्रा. एन. जे. पवार
12) प्रा. देवानंद शिंदे
13) प्रा. डी. टी. शिर्के

शिक्षक कर्मचारी 273
प्रशासकीय कर्मचारी 504
विद्यापीठात प्रवेश घेतलेले विद्यार्थी 7,147
बःहिस्थ विद्यार्थी 24,908
संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी 2,50,000
मुलांची वसतिगृहे 15
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह 1

शिवाजी विद्यापीठाचा स्थापनेपासून ते आजपर्यंत शैक्षणिक आलेख उंचावत आला आहे. विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. बदलत्या आव्हानांना सामोरे जात विद्यापीठाने शैक्षणिक प्रणालीत आमूलाग्र बदल केला आहे. संशोधन क्षेत्रात प्राध्यापकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.
– डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

Back to top button