बिद्री साखर कारखाना निवडणूक : सत्ताधारी गट ३ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर; कार्यकर्त्यांचा जल्लोष | पुढारी

बिद्री साखर कारखाना निवडणूक : सत्ताधारी गट ३ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर; कार्यकर्त्यांचा जल्लोष

बिद्री/ गारगोटी, पुढारी वृत्तसेवा: बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज (दि. ५) सकाळी सुरू झाली. आतापर्यंत आलेल्या कलानुसार सत्ताधारी गटाचे नेते व माजी आमदार के.पी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १६०० मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे.  १२० केंद्रावर मतमोजणी झाली असून आतापर्यंत ३४ हजार ४८९ मतांची मोजणी झाली आहे. त्यात सत्ताधारी गटाला ३ हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाली आहे.

सत्तारूढ गटाला मतांची वाढ होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष

निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी गटाला सुमारे १६०० मतांची आघाडी मिळताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. सत्ताधारी गटाने १२० टेबलावरील आकडेवारी मतांचा वरचष्मा ठेवला. राधानगरीतून ए. वाय. पाटील यांनी काही गावात फारसे मताधिक्य घेता आले नाही. त्यामुळे सत्ताधारी गट आघाडीवर राहिला. कल लक्षात येताच ए. वाय. पाटील यांनी केंद्रावरून काढता पाय घेतला.

हेही वाचा 

Back to top button