कोल्हापूर : मादळे येथे पुन्हा पंधरा गव्यांचा कळप, शेतीचे केले मोठे नुकसान | पुढारी

कोल्हापूर : मादळे येथे पुन्हा पंधरा गव्यांचा कळप, शेतीचे केले मोठे नुकसान

 शिरोली एमआयडीसी ; पुढारी वृत्तसेवा मादळे ता. करवीर येथे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मादळे प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस १४ ते १५ गव्यांचा कळप दिसून आला.  रस्त्याच्या अगदी जवळ रामचंद्र कोरवी यांच्या घराच्या मागे  गवे खाली उतारावरती फिरत असल्याने मादळे गावच्या मुख्य रस्त्यावरुन ते स्पष्ट पणे दिसून येत होते. गव्याबाबतची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्याने स्थानिक नागरिक व प्रवाशांनी गव्यांना बघण्यासाठी गर्दी केली होती.

या आधी चारच्या सुमारास हा कळप पोवार मळा शिवाराजवळ जंगलात लोकांना दिसून आला होता. तोच कळप पुढे जात कोरवी यांच्या घराच्या खालील बाजूस उत्तरेला दिसून आला. या कळपाने जवळपास दहा गवे पुर्ण वाढ झालेले व लहान चार ते पाच बच्चे असल्याचे बघणाऱ्यांनी सांगितले. येथून पुढे हा कळप मनपाडळे कडे गेला. हेच गवे गुरूवारी सायंकाळी कोपार्डे यांच्या शेतात शिरुन शाळवाचे पीक खात असताना शेतकऱ्यांनी हुसकावून लावले होते. कळप पुन्हा पुन्हा शिवारात घुसून धुडगूस घालत असल्याने शेतकरी स्थानिक नागरिकांमध्ये चितेचे असून यावर काहीतरी कायमस्वरूपी उपाय का अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button