Kolhapur News : टोप येथे रोड रोलर खाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू | पुढारी

Kolhapur News : टोप येथे रोड रोलर खाली चिरडून एकाचा जागीच मृत्यू

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : टोप (ता. हातकणंगले) येथे रोडरोलर अंगावरून गेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (दि.१) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास टोप हायस्कूल परिसरात घडली. या अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मल्लाप्पा बसप्पा नाईक ( वय ४० रा.पाडळी खुर्द ता करवीर ) असे आहे.

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, मल्लाप्पा बसप्पा नाईक हे टोप (ता. हातकणंगले) येथील टोप हायस्कूल परिसरात प्लाॅट पाडलेल्या जागेत रस्त्याच्या सपाटी करण्याचे काम करत होते. हे काम चालू असता रोड रोलरचे गिअर अडकल्याने रोडरोलर बंद पडला. तो दुरुस्त करण्यसाठी मल्लाप्पा नाईक हे खाली उतरून रोड रोलरच्या इंजिनचे डोअर खोलून काय बिघाड झालाय हे पाहत होते. दरम्यानअचानक रोड रोलर सुरू होऊन पुढे जाऊ लागला. नाईक यानी रोलर थांबविण्याचा प्रयत्न करत असता रोलर त्याच्या अंगावरून गेला. ते रोलर खाली चिरडले व त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर हा रोड-रोलर पुढे असणाऱ्या झाडावर जाऊन थांबला. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरा झाली आहे

हेही वाचा:

Back to top button