Maratha Reservation : कबनूरमध्ये मराठा आरक्षणासाठी पुन्हा साखळी उपोषण सुरू | पुढारी

Maratha Reservation : कबनूरमध्ये मराठा आरक्षणासाठी पुन्हा साखळी उपोषण सुरू

कबनूर : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत समाजाचा लढा चालूच राहिल असे प्रतिपादन सुनील इंगवले यांनी केले. कबनूर येथे मराठा समाजाच्या वतीने येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात मनोज जरांगे- पाटील यांनी कोल्हापूर येथील सभेत केलेल्या आवाहनानुसार पुन्हा १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले. ( Maratha Reservation )

संबंधित बातम्या 

मराठा समाजाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील यांनी स्वागत केले. सौ. मंगल इंगवले यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पहिल्या दिवशी सुनिल इंगवले, प्रा. रविंद्र पाटील, महेश शिवुडकर व अनिल साळुंखे हे उपोषणास बसले आहेत. यावेळी चंद्रकांत आडेकर, दत्तात्रय पाटील, पै. आण्णासो निंबाळकर, बाबासो कोकणे, संदीप जाधव, दत्तात्रय शिंदे, बाणदार, विष्णू चव्हाण, सुनील कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मिलिंद कोले, आप्पासाहेब पाटील, शिवाजी चव्हाण, हुसेन मुजावर, जयदीप इंगवले, रघुनाथ हळवणकर, शशिकला इंगवले आदी उपस्थित होते. ( Maratha Reservation )

Back to top button