Ajit Pawar : मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी एनडीएला भक्कम साथ देणार : अजित पवार

Ajit Pawar : मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी एनडीएला भक्कम साथ देणार : अजित पवार


कर्जत : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती, शिरूर, सातारा, रायगडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार देणार असल्याची जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे खंबीर नेतृत्वाची गरज असल्याने एनडीएला भक्कम साथ देऊन महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी अजित पवार यांनी दिली. ते कर्जत येथील रेडिसन ब्लु येथे आयोजित अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या वैचारिक मंथन शिबिरात बोलत होते. Ajit Pawar

आमच्यावर असा आरोप होत आहे की, आम्ही आमच्यावर असणाऱ्या केसेसमुळे, गैर व्यवहारांच्या आरोपाला घाबरून भाजप बरोबर सत्तेत सहभागी झालो. मात्र, हे खोटे आहे.  राजकारणात काम करताना आरोप हे होत असतात. पण ते सिद्ध झाले पाहिजेत. तरच त्याला अर्थ आहे. आता मी वारंवार त्याबाबत बोलणार नाही. आता आपल्याला मागे नाही, तर पुढे जायचे आहे . पक्ष संघटना मजबूत करायची आहे, असे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना अजित पवारांनी केले.  Ajit Pawar

मी नेहमीच राज्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे. माझ्या ३२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक जनतेच्या हिताचे निर्णय घेतले, कामे केली. काही वेळेस प्राप्त परिस्थितीनुसार राजकीय निर्णय घ्यावे लागतात. याचा अर्थ आम्ही आमच्या विचारांशी, विचारधारेशी तडजोड केली, असा अर्थ होत नाही. विरोधक नाहक आमच्यावर आरोप करत आहेत.

Ajit Pawar : इंडिया आघाडीवर हल्लाबोल …

पंतप्रधान नरेंद मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडीची निर्मिती करण्यात आली. मात्र, त्या नेत्यांमध्ये सुद्धा एकमत नाही. अजूनपर्यंत त्यांना इंडिया आघाडीचाच्या लोगोवर एकमत करता आलेले नाही. इंडिया आघाडीतील सर्व नेते गोंधळलेल्या स्थितीत आहेत.

विचार करायला लावणारी बाब म्हणजे जे इंडिया आघाडीत जाऊन आता भाजपला विरोध दर्शवितात. यातील बहुतेक पक्ष आणि त्यांची नेतेमंडळी यापूर्वी कधी ना कधी केंद्रात, राज्यात भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाली होती. यामध्ये ममता बॅनर्जी, नितीशकुमार, फारुख अब्दुला अशी अनेक नेत्यांची नावे सांगत अजित पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील… 

राज्याकडून तसेच केंद्राकडूनही जास्तीत जास्त निधी यासाठी मिळवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी हालचाली सुरु आहेत. तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याचा जास्तीत लाभ मिळावा, यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे.

भुजबळ गो बॅक…

गुरुवारी रात्री सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना भुजबळ कर्जतमधून मार्गक्रमण करत असल्याचे समजताच त्यांनी भुजबळ यांच्या गाडयांच्या ताफ्या समोर काळे झेंडे फडकवत  भुजबळ गो बॅक  चे नारे दिले . एकदरचं भुजबळ यांना होणारा वाढता विरोध लक्षात घेता शिबिरात ओबीसींच्या आरक्षणाबाबत थोडक्यात भूमिका मांडत भुजबळांनी काढता पाय घेतला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news