भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ४८ टक्के मतदान | पुढारी

भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ४८ टक्के मतदान

राशिवडे ; पुढारीवृतसेवा भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दु.१२ पर्यत ४८ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रामध्ये मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी तुरळक गर्दी होती. परंतु १० नंतर मतदान केंद्रावर गर्दी होऊ लागली.

राधानगरी, करवीर तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यातील घोटवडे, गुडाळ, राशिवडे बु,कंथेवाडी,येळवडे तर करवीरमधील हसुर दु, सडोली खा, कोथळी, बेले, म्हाळुंगे या मतदानकेंद्रावर पन्नास टक्के मतदान झाले. एका मतदान केंद्रावर तीन ते चार टेबल असल्याने मतदान प्रक्रीया गतीने होत होती.

हेही वाचा : 

Back to top button