पुढारी ऑनलाईन डेस्क : २१ नोव्हेंबरच्या आत एफआरपी द्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखान्यांना दिला आहे. गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये आणि पहिली उचल साडेतीन हजार रूपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीने आज कोल्हापूरात चक्काजाम आंदोलन केले.
कोणत्याही परिस्थितीत मागील वर्षीचे पैसे घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. सगळे कारखानदार एक झाले आहेत. राज्यातील सरकार कारखानदारांना सामील आहे. गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रूपये आणि चालूचा दर साडेतीन हजार रूपये मिळावा, यासाठी गावागावांत शेतकरी आंदोलन करत आहेत. आमच्या शेतातील ऊस सुरक्षित आहे. आमचं नुकसान नसून कारखान्यांचंच नुकसान आहे. त्यामुळे कारखानदारांनी तोंडाच कुलुप काढावं आणि भूमिका स्पष्ट करावी, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :