विशाळगड, पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील चाळणवाडी येथे आंबा वनविभागाच्या व शाहूवाडी येथील स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने श्रमदानातून विठ्ठलाई मंदिरानजीकच्या परिसरात वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. शुक्रवारी (दि १०) धनत्रयोदिवशी सकाळी हा उपक्रम राबवण्यात आला.
रखरखत्या उन्हात वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे व त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ नये, त्यांना पाण्याची सोय व्हावी, त्यांना गारवा मिळावा, या उद्दात हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. जंगलात ठिकठिकाणी अनेक पाणवठे तयार करण्यात येणार आहेत.
वनरक्षक दिग्विजय पाटील, डॉ. झुंझार माने, सचिन चौगुले, विश्वजीत पांढरे, प्रविण पांढरे, प्रसाद खोत, जय सुतार, ओम चव्हाण, वन मजूर आशिष दळवी, हरी पाटील, शिवाजी शिंदे, साहील कांबळे आदी श्रमदान मोहीमेत सहभागी झाले होते.
हेही वाचा