

राधानगरी ; पुढारी वृत्तसेवा राधानगरीसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विजांच्या गडगडाटासह परतीच्या पावसाने आज (बुधवार) सकाळपासून जोरदार सुरुवात केली. यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.
आज सकाळी पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. सकाळी सात वाजल्यापासून विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे भात पिकासह ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांचे हाल झाले. या पावसामुळे शेतकऱ्यांसह ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांची तारांबळ उडाली. सध्या भात कापणी व मळणीची कामे सुरू असून, शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे.
हेही वाचा :