गडहिंग्लज : अर्जुनवाडीत सत्तांतर : देसाई गटाची बाजी, मंडलिक गटाला धक्का | पुढारी

गडहिंग्लज : अर्जुनवाडीत सत्तांतर : देसाई गटाची बाजी, मंडलिक गटाला धक्का

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा अत्यंत चुरशीने झालेल्या अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. देसाई-पाटील गटाने सरपंचपदासह नऊ पैकी सहा जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित बहुमत प्राप्त केले आहे. विद्यमान सत्ताधारी असलेल्या उद्योजक विजयराव मंडलिक गटाला केवळ तीन जागा जिंकता आल्या असून, त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

येथील पंचवार्षिक निवडणूक अतिशय चुरशीने झाली. सत्ताधारी परिवर्तन ग्रामविकास आघाडीविरोधात श्री हुलवीरदेव ग्रामविकास आघाडीने दंड थोपटले होते. सत्ताधारी आघाडीकडून उद्योजक विजयराव मंडलिक, प्रकाश पाटील, हुलजी शोले, प्रमोद पाटील, बाळू नाईक, राजू जाधव यांनी तर हुलवीरदेव ग्रामविकास आघाडीकडून बाबासाहेब देसाई, एम. आर. पाटील, नारायणराव देसाई, जयवंत पाटील, बाळू नाईक यांनी धुरा सांभाळली होती. रविवारी ८५.०२ टक्के असे चुरशीने मतदान झाले होते. मतदानाचा टक्का वाढल्याने सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या होत्या.

आज (सोमवार) निकाल जाहीर झाला. यावेळी राष्ट्रवादी-भाजप पुरस्कृत श्री हुलवीरदेव ग्रामविकास आघाडीने सहा जागांवर बाजी मारली. मंडलिक गटाला केवळ तीन जागा राखता आल्या. हेमांगी देसाई यांनी थेट सरपंचपदी विजय मिळविला आहे. हुलवीरदेव आघाडीकडून अभिजीत देसाई, पांडुरंग दळवी, इंदुबाई पाटील, महादेव पवार, गीता दोरुगडे, ईश्वर नाईक हे विजयी झाले. मंडलिक गटाच्या मालुताई देसाई, गीता पाटील, गंगुबाई नाईक यांनी विजय मिळविला आहे.

हेही वाचा :

Back to top button