कोल्हापूर: कबनूरमध्ये साखळी उपोषणात महिलांचा एल्गार | पुढारी

कोल्हापूर: कबनूरमध्ये साखळी उपोषणात महिलांचा एल्गार

कबनूर : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी कबनूर सकल मराठा समाजाच्यावतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणात मंगळवारी (दि.३१) महिलांनी सहभाग घेतला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणून घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रा.रवींद्र पाटील यांनी स्वागत केले. आज मनोहर सूर्यवंशी, जयदीप इंगवले, प्रवीण इंगवले  उपोषणाला बसले आहेत.

मराठा समाज इचलकरंजीचे अध्यक्ष अमृत भोसले, मोसमी आवाडे, संतोष सावंत, वैशाली पाटील, नितीन काडाप्पा, दत्तात्रय पाटील, रवींद्र धनगर, विक्रम पाटील, बाळू कामत आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राजश्री इंगवले, मंगल इंगवले, राधिका भोसले, हर्षदा पाटील, सुनिता कदम, सुरेखा कदम, रोहिणी पाटील, शांता पाटील, सोनाली पासले, अनिता यादव, ज्योती इंगवले, सीमा इंगवले, अश्विनी इंगवले, रेखा कदम, कलावती घुणके, राधाबाई इंगवले, शितल गोडसे, मीना कोंडेकर, दिपाली इंगवले, शर्वरी इंगवले आदी उपस्थित होत्या.

हेही वाचा 

Back to top button