कोल्हापूर: खणदाळ येथे गोठ्यात श्वास गुदमरून ७ जनावरांचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर: खणदाळ येथे गोठ्यात श्वास गुदमरून ७ जनावरांचा मृत्यू

नूल: पुढारी वृत्तसेवा: खणदाळ (बाळूमामा वसाहत, ता. गडहिंग्लज) येथे गोठ्यात श्वास गुदमरून सात जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये चार म्हशी, दोन शेळ्या, एक रेडा, दोन कोंबड्या यांचा समावेश आहे.

नंदकुमार भीमा दिवटे यांच्या गोठ्यात ही घटना घडली. दिवटे यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे नूल व खणदाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा 

Back to top button