कोल्हापूर : भुये येथील विहिरीत सापडला अज्ञात पुरूषाचा सांगाडा | पुढारी

कोल्हापूर : भुये येथील विहिरीत सापडला अज्ञात पुरूषाचा सांगाडा

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : भुये (ता. करवीर) येथे एका पडक्या विहिरीत अनोळखी पुरुषाचा सांगाडा सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील भूये येथील जमीन गट नंबर २५१ मध्ये असलेल्या पडक्या व दल दल असलेल्या विहिरीमध्ये एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह २४ सप्टेंबर रोजी आढळून आला आहे. हा मृतदेह म्हणजे जिर्ण होऊन सांगाडाच राहिलेला आहे. वय अंदाजे २८, उंची पाच फुट पाच इंच त्याच्या अंगावर काळ्या रंगाचे जॅकेट, काळ्या रंगाची जिन्स असा पेहराव आहे. सांगाडा विहिरीमधून बाहेर काढून वैद्यकीय अधिकारी भूये यांनी शवविच्छेदन केले. मृताची ओळख पटविण्यासाठी डीएनए तपासणी करण्यात येणार आहे. सदर व्यक्तीचे कोणी नातेवाईक असल्यास किंवा या व्यक्तीसंबंधी माहिती असेल तर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यांतील पोलिस हवालदार महेश घाटगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button