कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये ५० पैशाने वाढ करण्याचा तर गायीच्या दूध खरेदी दरात २ रुपयाने कपात करण्याचा निर्णय गोकुळ संचालकांच्या (Gokul Milk) बैठकीत आज (दि.३०) घेण्यात आला, अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.
गोकुळशी सलग्न म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून गोकुळने म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. रविवार (दि.१) पासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या पुढील म्हैस दुधास प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे तर ५.५ फॅट ते ६.४ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या दुधास प्रतिलिटर १ रुपयाने दूध खरेदी दरात वाढ केली आहे. सत्तांतरानंतर म्हैस दुधात आतापर्यंत सहाव्यांदा खरेदी दरवाढ करण्यात आली आहे. याचा सुमारे दोन लाख म्हैस दूध उत्पादकांना लाभ होणार आहे. यामुळे दूध उत्पादकांना गोकुळला जादा ३ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तर गाय दुधाच्या खरेदीचे दर मात्र प्रतिलिटरला २ रुपयाने कमी करण्यात आले आहेत.
हेही वाचा