खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराला 'ब' वर्गसाठी प्रस्ताव पाठवणार: सारिका कदम | पुढारी

खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराला 'ब' वर्गसाठी प्रस्ताव पाठवणार: सारिका कदम

कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असणाऱ्या कोपेश्वर मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी ग्रामपंचायतीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे लवकरच पाठवणार असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच सारिका कदम यांनी आज (दि.२४) पत्रकार परिषदेत दिली.

कदम म्हणाल्या की, खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात २० व्या शतकापर्यंत विविध देशातून अनेक प्रवासी येऊन गेले आहेत. ज्यावेळी हे प्रवासी, व्यापारी महाराष्ट्रातून गेले, त्यावेळी विश्रांतीच्या वेळी व पावसाळ्यात प्रवास न करता एका ठिकाणी मनोरंजन कसे होईल. त्यासाठी त्यांच्या देशात असलेले पट-खेळ खेळत होते. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या सभामंडपात हा खेळ कोरून ठेवला आहे. पूर्वीपासून या ठिकाणी देश- विदेशातून पर्यटक भेटी देत असतात, याचा इतिहास आहे.

मंदिर सध्या क वर्ग तीर्थक्षेत्रात आहे. मंदिर आणि परिसराचा विकास करण्यासाठी ब-वर्ग तीर्थक्षेत्रात समाविष्ट करून पर्यटन ब-वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवणार आहे. वर्षाला या मंदिराला लाखो भाविक भेट देतात. विविध हिंदू सणांच्या वेळी याठिकाणी वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त असतो. याबाबत पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार डॉ.राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्याशी चर्चा केली आहे. येत्या मासिक सभेत ब-वर्ग तीर्थक्षेत्राचा ठराव करून प्रस्ताव पाठवणार असल्याचे सरपंच कदम यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button