कडगाव (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), पुढारी वृत्तसेवा : गारगोटी- पाटगाव राज्य मार्गावर नितवडे वाकीघोल फाटा वळणावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात एसटीमधील सारिका निलेश पाटील (रा. वडाचीवाडी, ता. राधानगरी) ही महिला प्रवासी गंभीर जखमी झाली तर इतर चार महिला प्रवाशी किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्यावर गारगोटी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडणेत आले.
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, गारगोटी आगाराची गाडी (MH40 N 8407) ही एक बस घेऊन चालक अनिल शिंत्रे कडगावपासून चाफोडीकडे जात होते तर दुसरी बस (MH40N9240) चालक संदीप पाटील हे गारगोटीहून भटवाडीकडे घेऊन जात होते. दरम्यान, नितवडे ते आडोली फाटा गोठनाई मंदिराजवळ चाफोडीकडील वळणावर भटवाडी गाडीने समोरून चाफोडी गाडीच्या ड्रायव्हर शीटच्या मागच्या बाजूला धडक दिल्याने अपघात झाला.
या अपघातात सारिका पाटील या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर गारगोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. तर किरकोळ जखमी मिलाग्रीस गोन्साल्वीस, सुशिला डिसोजा (रा. गावठान, ता. राधानगरी), लक्ष्मी भिकाजी जोशी (रा. फये), अंजली डिसोजा यांना उपचार करून घरी सोडणेत आले आहे. या दोन्ही बसमध्ये एकूण १६ प्रवाशी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची नोंद भुदरगड पोलीस स्थानकात झाली आहे.
हेही वाचा