कोल्हापूर: पन्हाळ गडावर जालना घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

कोल्हापूर: पन्हाळ गडावर जालना घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

पन्हाळा: पुढारी वृत्तसेवा: किल्ले पन्हाळगड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज (दि.३) सकाळी जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील शिवमूर्तीस पुष्पहार घालून मोर्चाला सुरूवात झाली. शिवमंदिर ते सज्जा कोटी ते बस स्थानक ते बाजीप्रभू चौक ते पन्हाळा बस स्थानक ते मयूर बाग असा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात लोकप्रतिनिधी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मराठा आंदोलकांना केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

पन्हाळा पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव चौगुले, सचिन पाटील, प्रकाश ढमाळे, महिला पोलीस वैशाली राजपाल, आशा पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news