विशाळगड: पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक पावनखिंड मार्गावरील पांढरेपाणी-पावनखिंड रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहेत. रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून रोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. रस्ता अतिशय खराब झाल्याने रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहे.
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने तसेच बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रम व बलिदानाने पावन झालेल्या पावनखिंडीत अलीकडे पर्यटकांचा ओढा वाढल्याने खिंड नेहमीच गजबजलेली असते. त्यामुळे पांढरेपाणी- पावनखिंड रस्त्यावर रोज हजारो वाहनांची रहदारी असते. मात्र, अलीकडे हा रस्ता खड्डयांच्या विळख्यात सापडला असून वाहनांचे पाटे तुटणे, पंक्चर होणे, छोटे-मोठे अपघात होणे आदी प्रकार वाढल्याने पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी पर्यटकांतून होत आहे.
हा रस्ता अतिशय खराब झाला असून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ऐतिहासिक पावनखिंडीत येणाऱ्या पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र भरातून अनेक पर्यटक येथे पर्यटनासाठी येत असल्याने रस्त्याची डागडुजी करण्याची आवश्यकता आहे.
– सुमित देसाई, पर्यटक, पुणे
हेही वाचा