

हुपरी; पुढारी वृत्तसेवा : येथील श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक लि. हुपरी या संस्थेची ७४ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचा आप्पासाहेब नाईक (दादा) श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँक लि., हुपरी असा नामविस्तारीकरणाचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भौजे होते.
अध्यक्ष भोजे यांनी उपस्थित सभासदांचे व मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये बँकेचे कार्यकारी शिवराज नाईक यांनी बँकेची आर्थिक स्थिती सभासदांना कर्जाच्या माध्यमातून देण्यात येणा-या निरनिराळ्या सवलती ठेवीच्या दरामध्ये केलेली वाढ आदी बार्बीचा आढावा घेतला. नोटीस वाचन बँकेचे मॅनेजर बाळासाो येळवडे यांनी केले. मागील प्रोसिडींग, अहवाल व ताळेबंद वाचन, खर्चाचे अंदाजपत्रक या विषयांचे वाचन असि. मॅनेजर गजानन माळी, यांनी केले. उर्वरित विषांचे वाचन जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील व कर्ज अधिकारी शिरिष आवटे यांनी केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले.
बँकेच्या ठेवी १३१ कोटी ७० लाख, कर्जे ९३ कोटी, गुंतवणूक ६५ कोटी ९४ लाख, ढोबळ नफा ४ कोटी ४ लाख रूपये, निव्वल नफा ८९ लाख रूपये, व्यवसाय उलाढाल ९५१ कोटी ६१ लाख, तसेच बँकेच्या सभासदांनी वेळेत कर्ज परतफेड केलेने अशा ४९९ सभासदांना ४३ लाख इतक्या रक्कमेची व्याजात सूट देणेत आली आहे.
यावेळी आभार ज्येष्ठ संचालक कल्लाप्पाण्णा गाट यांनी मानले व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील यांनी केले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शामराव गायकवाड, कल्लाप्पाण्णा गाट, विलासराव नाईक, प्रकाश जाधव, बाळासाो गाट, शितलकुमार पाटील, धनाजीराव भोसले, अमर गायकवाड, आनंदराव उलपे, धनंजय खेमलापूरे, अरूण कांबळे, संतोष पाटील, घनश्याम माळी, सुशीला गोंधळी, मैथीली पाटील आदी. उपस्थित होते.
हेही वाचा :