कोल्हापूर: मेतकेत बाळूमामांनी रोवलेला रणखांब रविवारीपासून दर्शनासाठी खुला | पुढारी

कोल्हापूर: मेतकेत बाळूमामांनी रोवलेला रणखांब रविवारीपासून दर्शनासाठी खुला

हमिदवाडा: पुढारी वृत्तसेवा: सद्गुरू बाळूमामा यांचे मूळक्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या कागल तालुक्यातील मेतके येथील श्री. हालसिद्धनाथ-बाळूमामा मंदिरात स्वतः मामानीच रोवलेला रणखांब रविवारी (दि. २०) पासून दर्शनासाठी खुला केला जाणार आहे. दरवर्षी फक्त श्रावण महिन्यात हा रणखांब खुला केला जातो.

बाळूमामा यांनी १९३२ मध्ये भक्तांची ईडा पिडा कमी व्हावी, या उद्देशाने हा १४ फूट उंचीचा रणखांब रोवल्याचे सांगण्यात येते. १९७५ पर्यंत तो उघड्यावरच होता. नंतर मंदिर उभारणी झाल्यावर मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या हाताला त्याचे स्थान आले. ‘एक खाब कैलासात व दुसरा मेतक्यात..!’ असे याबाबत बाळूमामा म्हणत. हा खांब खराब होऊ नये, यासाठी ट्रस्टने त्याच्या सभोवती पंचधातूचे आवरण केले आहे. हेच आवरण काढून मूळ रणखांब भाविकांना दर्शनासाठी श्रावण महिन्यात दि. २० ऑगस्ट ते १७ सप्टेंबरपर्यंत खुला करण्यात येणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सद्गुरू बाळूमामा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. बाळूमामांनी याच ठिकाणी भंडारा सुरु करण्यासाठी परिसरातील 40 गावांना सांगावा दिला होता. व ती परंपरा आजही कायम आहे.

हेही वाचा 

Back to top button