कोल्हापूर : जांबुर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिलीप निकम बिनविरोध!

कोल्हापूर : जांबुर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिलीप निकम बिनविरोध!
Published on
Updated on

सरूड, पुढारी वृत्तसेवा : जांबुर (ता. शाहूवाडी) येथील ग्रुप ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी दिलीप जगनाथ निकम यांची बिनविरोध निवड झाली. ते जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांचे ते खंदे समर्थक आहेत. या निवडसभेच्या अध्यक्षस्थनी भेडसगांव मंडल अधिकारी शिंदे हे होते. प्रास्तविक केशव डिगे यांनी केले. कार्यक्रम पत्रिकावाचन तलाठी सर्जेराव शिंदे यांनी केले.

ग्रामपंचायत सदस्य छाया पाटील यांनी निकम यांचे नाव सुचवले. यावेळी एकमात्र नामनिर्देशन दाखल झाल्याने सरपंच म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. निवडीनंतर सरपंच निकम यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढून गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला. माजी सरपंच बळवंत कोठारी यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच केशव पाटील, रंगराव भोसले, शिवाजी पाटील, दिपक पाटील, संजय डिगे यशवंत पाटील, संस्थांचे पदाधिकारी, सर्व तरुण मंडळे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार ग्रामसेवक कोळी यांनी मानले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news