कोल्हापूर : कुक्कुडवाडीच्या वृध्देची बनावट सोने देऊन ८७ हजारांची फसवणूक | पुढारी

कोल्हापूर : कुक्कुडवाडीच्या वृध्देची बनावट सोने देऊन ८७ हजारांची फसवणूक

राशिवडे, पुढारी वृत्तसेवा : कुक्कुडवाडी (ता. राधानगरी) येथील नानुबाई दादु पाटील (वय ६५) या वृद्धेचे  ८७ हजार ५०० रुपये किंमतीचे सोने घेऊन तिला बनावट सोने देऊन अज्ञात महिला व दोन पुरूषांनी फसवणूक केली. याबाबत वृध्देने राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नानुबाई पाटील या कसबा तारळेकडून कुक्कुडवाडी गावाकडे जात असताना एक महिला व दोन पुरुष त्यांना भेटले. मला पैशाची अडचण असून आपल्याकडील पाच तोळ्याच्या पुतळ्या घेण्याचा हट्ट धरला. परंतु पाटील यांनी नकार देताच त्या महिलेसोबत असणाऱ्या दोन पुरुषांनी ते जुने सोने असल्याचे सांगुन पाटील यांच्या अंगावरील कानातील दोन कुड्या, बोरमाळ असे ८७ हजार ५०० रुपये किंमतीचे सोने घेऊन पसार झाले. त्यानंतर पाटील यांनी भामट्या महिलेने दिलेल्या पुतळ्या जिन्नसची सोनाराकडे तपासणी केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणाची तक्रार राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, पोलीस नाईक गुरव करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button