कोल्हापूर : 137 ग्रा.पं.ची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध | पुढारी

कोल्हापूर : 137 ग्रा.पं.ची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 51 ग्रामपंचायतींच्या 78 रिक्त जागांसाठी गुरुवारी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या. या ग्रामपंचायतींसाठी ऑगस्टअखेर अथवा सप्टेंबरमध्ये निवडणुकींचा धुरळा उडणार आहे.

जून ते डिसेंबरअखेर मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. यामध्ये गारगोटी, सरवडे, कसबा वाळवे, बाजारभोगाव, वाशी, चिंचवाड आदी महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सार्वत्रिक निवडणुकांसह थेट सरपंचपदाच्या चार रिक्त जागांसह 51 ग्रामपंचायतींच्या 78 जागांसाठी पोटनिवडणूकही होणार आहे. यामध्ये चंदगड तालुक्यातील सर्वाधिक 20 रिक्त जागांचा समावेश आहे. शाहूवाडी तालुक्यातील 17, करवीर तालुक्यातील 10 रिक्त जागांचा समावेश आहे.

प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर दि.21 ऑगस्टपर्यंत हरकत घेता येणार आहेत. दाखल झालेल्या हरकती, सूचनांवर निर्णय होऊन दि.25 ऑगस्ट रोजी या मतदारयाद्या अंतिम केल्या जाणार आहेत. कोणत्याही क्षणी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

पाच सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक

चंदगड तालुक्यातील कागणी, पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे, भुदरगड तालुक्यातील वरपेवाडी, करवीर तालुक्यातील म्हाळुंगे आणि शाहूवाडी तालुक्यातील शाहूवाडी या गावात थेट सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होणार आहे. शाहूवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर यापूर्वी बहिष्कार घालण्यात आला होता. त्याच्या सरपंचपदासह दहा सदस्यांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

सार्वत्रिक निवडणुका होणार्‍या ग्रामपंचायती

आजरा-मेंढोली, मसोली, बुरूडे, सुलगाव, पेरणोली, वेळवट्टी, देऊळवाडी, हरपवडे.

करवीर- चिंचवाड, शिरोली दु., केकतवाडी, वाशी, सांगवडेवाडी, निटवडे, गणेशवाडी, जठारवाडी, धोंडेवाडी, बहिरेश्वर.
गडहिंग्लज- अर्जुनवाडी.

चंदगड-कडलगे खुर्द,जट्टेवाडी, कलिवडे, कोदाळी, शिरोली, भोगोली, कानूर खुर्द, उमगाव, लाकूरवाडी, शिवनगे, सडेगुडवळे, कुरणी, तुर्केवाडी, बुजवडे, तांबूळवाडी, आंबेवाडी, माणगाव, मुरकुटेवाडी, उत्साळी, मिरवेल, अमरोली, गणूचीवाडी.

पन्हाळा- वाळवेकरवाडी, बाजारभोगाव, काटेभोगाव, देवठाणे, माजगाव, सुळे, माळवाडी, कोदवडे, बादेवाडी, महाडिकवाडी, शिंदेवाडी, कसबा ठाणे, खोतवाडी, बोरीवडे.

भुदरगड- हणबरवाडी, चांदमवाडी, निष्णप, गारगोटी, शिंदेवाडी, कोंडोशी, पिंपळगाव.

राधानगरी- मांगेवाडी, सरवडे, रामणवाडी, फेजिवडे, बारडवाडी, चक्रेश्वरवाडी, कसबा वाळवे, मालवे, न्यू करंजे,चांदेकरवाडी, फराळे, पालकरवाडी.

शाहूवाडी-मालेवाडी, सावर्डे खुर्द, सुपात्रे, सावे, शेंबवणे, वालूर, माण, कासार्डे, ऐनवाडी, गेळवडे, गावडी, आकुर्ळे.

Back to top button