कसबा बावडा-राजाराम बंधारा मार्गे वडणगे, निगवेच्या रस्त्यावरून वाहतूक सुरु

राजाराम बंधारा वाहतूक सुरु
राजाराम बंधारा वाहतूक सुरु
Published on: 
Updated on: 

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा या वर्षीच्या पावसाळ्यात शुक्रवार दि. ७ जुलै रोजी तसेच सोमवार दि. १७ जुलै रोजी सायंकाळी पुन्हा दुसऱ्यांदा राजाराम बंधारा पंचगंगेच्या पाण्याखाली गेला होता. दरम्‍यान शुक्रवार दि.११ ऑगस्ट रोजी सकाळपासून या बंधाऱ्यावरून वाहतूक सुरु झाली. २४ दिवसानंतर बंधाऱ्यावरून पुन्हा वाहतूक सुरू झाली आहे. पुलाच्या मध्यावर यापूर्वी स्लॅबचा थर वाहून गेलेल्या ठिकाणी सकाळी सहा इंच पाणी होते त्यातूनच वाहतूक सुरू झाली.

बंधाऱ्याच्या कसबा बावड्याकडील जोड रस्त्यावर चिखल, कचरा, लाकडी बुंधे पुराच्या पाण्यातून वाहून आले होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून गुरुवारी या रस्त्याची साफसफाई करण्यात आली. रस्त्याकडेला पंचगंगेच्या पुरात वाहून आलेला कचरा एकत्रित करून ठेवला असून, दुपारच्या दरम्यान तो लाईन बाजार येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थळी पाठवण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news