कोल्हापूर : केळोशी बु येथील अपघातात आपटाळ येथील एकाचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : केळोशी बु येथील अपघातात आपटाळ येथील एकाचा जागीच मृत्यू

Published on

धामोड : पुढारी वृत्तसेवा : केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथे मोटरसायकलचा अपघात होऊन आपटाळच्या एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला आहे. संजय तुकाराम पाटील असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

केळोशी बु ॥ पैकी हणबरवाडी येथील बंडोपंत सुतार याच्या भातरोप लागणीसाठी आपटाळ येथील संजय तुकाराम पाटील हा मदत करण्यासाठी गेला होता. पण पॉवर टिलरचा खोळंबा झाल्यामुळे त्याचे साहित्य आणण्यासाठी काल रविवारी (दि.२३) रोजी सायंकाळी दोघेजण केळोशी बुद्रुक येथे आले होते. यानंतर ते पॉवर टिलरचे साहित्य घेऊन हणबरवाडीकडे जात होते.

हणबरवाडी येथे मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे हणबरवाडी रस्त्यावरील साकवाजवळ संरक्षक कठड्याला संजयची मोटारसायकल धडकली आणि सुमारे वीस फुट खोल ओढ्यात कोसळली. यावेळी संजय पाटील हा दगडावर आपटून पाण्यात पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर बंडोपंत सुतार हा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली आहे.

सदर घटनेची राधानगरी पोलीसात नोंद झाली असून पोलीस कॉन्स्टेबल शिंदे हे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news