China school Gym roof collapses | चीनमधील शाळेतील जीमचे छत कोसळून १० ठार | पुढारी

China school Gym roof collapses | चीनमधील शाळेतील जीमचे छत कोसळून १० ठार

पुढारी डेस्क : चीनमधील किकिहार शहरात रविवारी शाळेतील व्यायामशाळेचे काँक्रिटचे छत कोसळून १० जण ठार झाले. तर अनेक जण जखमी झाले आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता आहे, अशी माहिती चीनमधील माध्यमांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शेजारच्या इमारतीच्या बांधकामादरम्यान जिमच्या छतावर आनावश्यक सामान टाकण्यात आले होते. दरम्यान पावसाच्या पाण्यामुळे शाळेच्या जिमचे छत जड होऊन ते कोसळले असावे. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी बांधकाम करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या दुर्घटनेसंदर्भात तपास सुरू असून, बचावकार्य अजूनही सुरू आहे.

China school Gym roof collapses : जीमध्ये होते १९ जण

किकिहार शहरातील 34 मिडल स्कूलमध्ये असलेल्या जिममध्ये ही दुर्घटना घडण्यापूर्वी १९ जण उपस्थित होते. दरम्यान जिमचे छत अचानक कोसळले, त्यामुळे जिममध्ये असलेले लोक ढिगाऱ्याखाली सापडले. घटनेच्या वेळी या अपघातातून चार जण बचावले असून १५ जण अडकले होते. आतापर्यंत १३ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Back to top button