

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा पंचगंगेने पहाटे तीन वाजता 39 फूट इशारा पातळी ओलांडली. पंचगंगा आता धोक्याच्या पातळीकडे जात आहे. पंचगंगेची पातळी आता 39.4 फूट झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, धरणाच्या पाण्यासाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
राधानगरी धरण 90 टक्के भरले आहे. मंगळवार दि.25 पर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरून स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. यामुळे पूरस्थितीत वाढ होण्याचा धोका आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर सहा ठिकाणी पाणी आले असून, या मार्गावरून कोकणात जाणारी वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. जिल्ह्यात 82 बंधाऱ्यावर पाणी असून, सुमारे 55 मार्गावर पाणी असल्याने त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
हेही वाचा :