कोल्हापूर: नागांव येथे जुगार अड्ड्यावर छापा; २१ जणांना अटक

कोल्हापूर: नागांव येथे जुगार अड्ड्यावर छापा; २१ जणांना अटक

शिरोली एमआयडीसी, नागांव (ता. हातकणंगले) येथील जुगार अड्ड्यावर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकली. २१ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुमारे १ लाख रोख व १२ मोटारसायकल, १९ मोबाईल असा साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री केली.

पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नागांव (ता. हातकणंगले) येथील एक लोकप्रतिनिधी व हेरले येथील अन्य एकाच्या भागीदारीत हा जुगार अड्डा गेली कित्येक दिवसांपासून सुरू होता. या कारवाईत हेरले येथील भागीदाराचे नाव जरी पुढे आले नसले तरी पोलिसांनी याचा तपास करणे गरजेचे आहे.

या कारवाईत नागांव ग्रामपंचायत सदस्य श्रेयस भाऊसो नागांवकर (रा. नागांव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), प्रेमकुमार रमेश पाटील (वय २१, रा. नागोबा गल्ली, पेठवडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), राजेंद्र जिनेंद्र पाटील (वय ४३, रा. चोकाक, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) , सोहेल प्रकाश महापुरे (वय २५, रा. आनंतनगर, कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), सुरेश कल्लाप्पा पाटील वय ३४, रा. यादववाडी, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), अमित विजय वडर (वय ३३, रा. माळवाडी, नागांव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), परशराम जंबा नायकवडी (वय ४०, रा. माळवाडी, टोप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), प्रेम शिरीषकुमार देशिंगे (वय ३२, रा. चोकाक, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), नितीन दिलीप थोरात (वय ३२, रा. गोटखिंडी, ता. वाळवा, जि. सांगली), सर्जेराव शामराव पवार (वय ३५, रा. निगवे दुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर), कुबेर बळवंत पोवार (वय ३०, रा. टोप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सचिन आनंदा थोरबोले (वय ३१, रा. साठेनगर, कुंडल, ता. पलूस, जि. सांगली), रमेश नारायणदास खटीयानी (वय ५३, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर), संजय रमेश माने (वय ४२, रा. वरुण विहार कॉलनी, उंचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर), महादेव प्रभाकर जाधव (वय ३४, रा. निंबळक, ता. तासगांव, जि. सांगली), संदिप विठ्ठल चौगले (वय ४०, रा. माले मुडशिंगी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), उत्तम बाजीराव पाटील (वय ४०, रा. बोरपाडळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), सल्लाउद्दीन मुस्तफा मुल्लाणी (वय ४०, रा. शोभानगर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), मारुती तानाजी साळुंखे (वय ४०, रा.निंबळक, ता. तासगांव, जि. सांगली), सुनिल रविंद्र रसाळ (वय ३३, रा.माळवाडी, टोप, ता. हातकणंगले), रोहीत सुरेश जाधव (रा. वैभवनगर, वारणा कोडोली, ता. पन्हाळा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम ९७ हजार ५० रूपये १९ मोबाईल फोन , १२ मोटरसायकली, पत्याची पाने असे एकूण ६ लाख ४५ हजार ५० रूपये मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला .

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, रामचंद्र कोळी , कृष्णात पिंगळे, युवराज पाटील, प्रितम मिठारी, अशोक पोवार, सागर चौगले, सुशिल पाटील, राजेंद्र वरांडेकर यांच्या पथकाने केली.

हा जुगार अड्डा ग्रामपंचायत सदस्य श्रेयस नागांवकर यांच्या मालकीच्या जागेत आहे. ही कारवाई करतेवेळी श्रेयश नागांवकर याने शेतवडीतून पळ काढला. श्रेयस नागांवकर व हेरले येथील अन्य एका व्यक्तीच्या भागीदारीत हा जुगार अड्डा चालू होता. पण या कारवाईतून भागीदार निसटला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news